मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला! kidnapped & raped a girl

मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!

मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंडका भागातील एका २१ वर्षीय मुलीचं अपहरण करून मुलाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नव्हे, तर बलात्काराच्या वेळीतिचा अश्लील एमएमएसही बनवला.

तरुणाच्या घरच्यांचा मात्र या आरोपांना विरोध आहे. मुलगा आणि मुलगी यांनी पळून जाऊन लग्न केल्याचं मुलाच्या पालकांचं म्हणणं आहे. पोलिसांनीही या गोष्टीलाच दुजोरा दिला आहे. तरुण आणि तरुणी मे महिन्यात घरातून पळून गेले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याची तक्रार नोंदवली होती. याच दरम्यान मुलगा आणि मुलगी हे लग्न करून परतले.

दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच लग्नाचं शपथपत्र न्यायालयात सादर केलं आहे. यानंतर दोघंही आपापल्या घरी निघून गेले. मात्र तरुणीच्या कुटुंबाचा आरोप आहे की मुलीवर बलात्कार करुन तिचा अश्लील एमएमएस बनवण्यात आला आहे. त्यामुळे मुलीने घाबरून पोलिसांपुढे खोटी कबुली दिली आहे. मात्र कोर्टात शपथपत्र दिलं असल्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 16:45


comments powered by Disqus