भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्याkills wife for not putting tomato in vegetable dish

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, डेहरादून

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

ऋषिकेशच्या लक्ष्मण झूला भागातील ही घटना आहे. आरोपी चौकीदार म्हणून नोकरी करतो. आपला गुन्हा कबूल करत त्यानं सांगितलं की त्याला भाजरी टोमॅटो न दिसल्यानं इतका राग आला की त्यानं बायकोचं डोकं भिंतीवर आपटलं.

डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचं प्रभा देवी नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 10:21


comments powered by Disqus