Last Updated: Monday, February 3, 2014, 12:34
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदेशाचे पंतप्रधानपद हे प्रयोगशीलतेसाठी आणि नवशिक्यांसाठी नसून उत्तम प्रशासक असलेल्या व्यक्तीसाठी आहे, असा टोला किरण बेदी यांनी अरविंद केजरीवाल यांना नाव न घेता लगावला आहे.
नरेंद्र मोदी स्वतःला सिद्ध करून दाखवल्याने तेच या पदावरती दावेदार ठरू शकतात, असं मतही किरण बेदी यांनी व्यक्त केलं आहे.
`फोरम फॉर इन्टेग्रिटी एन्ड नॅशनल सेक्युरिटी`च्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
देश हजारो करोड रुपयांची उधार घेऊन चालत असताना देशाला स्थिर आणि सक्षम सरकारची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळं आपलं मत बाद करू नका असं आवाहन किरण बेदी यांनी केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 3, 2014, 12:31