बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर Krupashankar Singh in trouble

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर
www.24taas.com, नवी दिल्ली

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे. एसआयटीनं याबाबतचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी एसआयटीला फटकारलं आहे. चौकशीचा अहवाल आत्तापर्यंत का सादर केला नाही, असा सवालही सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत एसआयटीला देण्यात आली आहे. मुंबई पोलीसांच्या देखरेखी खाली हा तपास सुरू आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती साठवल्याचा कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप आहे.

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हायकोर्टाच्या आदेशानं कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे, पुरावे नष्ट करणे, फौजदारी विश्वासघात, बोगस इच्छापत्र, बनावट कागदपत्र, भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर करुन भ्रष्टाचार असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

First Published: Monday, February 4, 2013, 19:24


comments powered by Disqus