Last Updated: Friday, January 25, 2013, 21:50
www.24taas.com, कर्नाटक कर्नाटकातील भाजप सरकार संकटात सापडलंय. येडियुरप्पा समर्थक १३ आमदारांनी राजीनामे देण्याचा इशारा दिल्यानं जगदीश शेट्टर सरकार अडचणीत आलंय.
राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना ४ फेब्रुवारीपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिलेत. शेट्टर यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यातल्या राजकीय स्थितीची त्यांना माहिती दिली. आपल्याकडं बहुमत असल्याचा दावाही शेट्टर यांनी केलाय. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत सध्या दोन जागा रिकाम्या आहेत. येडियुरप्पा समर्थक १३ आमदारांनी राजीनामा दिल्यास संख्याबळ २०९ इतकं राहतं. त्यामुळं बहुमतासाठी १०५ संख्या गरजेची आहे.
First Published: Friday, January 25, 2013, 21:40