कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार, Kudankulam nuclear energy project: Bomb Explosion,

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार

कुडनकुलम अणुऊर्जा  प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार
www.24taas.com, झी मीडिया, कुडनकुलम

तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या इदिन्तकाराई या गावात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन सहाजण ठार तर दोन जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.

इदिन्तकाराई गावातील इदिनगर त्सुनामी वसाहतीत गावठी बॉम्ब बनवण्याचं काम सुरू होते. त्यावेळी अपघाताने या बॉम्बचास्फोट झाला. या स्फोटाची तिव्रता कमी होती मात्र त्यावेळी उपस्थीतांची संख्या जास्त असल्याने मृतांची संख्या वाढली.

इदिन्तकाराईत मदत आणि बचावकार्य सुरु आहे. स्फोटानंतर दोन घरांना आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. तसंच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इदिन्तकाराई हे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील निदर्शनाचं मुख्य स्थळ आहे. हा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी इथले नागरिक गेल्या दोन वर्षांपासून विरोध करत आहेत. दरम्यान स्फोटाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013, 10:23


comments powered by Disqus