Last Updated: Wednesday, January 22, 2014, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआम आदमी पार्टीचे कार्यकारिणी सदस्य कुमार विश्वासने केरळातील नर्सेस विरोधात केलेल्या अपमानकारक शेरेबाजीवर माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, असं कुमार विश्वास यांनी म्हटलंय.
कुमार विश्वासचा रांची शहरात २००८ साली एक कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात केरळच्या नर्सबद्दल कुमार विश्वास यांनी विनोद केला, ही क्लिप कुमार विश्वास यांनी काही दिवसापूर्वी यू-ट्यूबवर अपलोड केली होती.
माफी मागतांना दिलेल्या स्पष्टीकरणात कुमार विश्वासने म्हटलं आहे. "मला माहित आहे, कविसंमेलनातील एका क्लिपवरून केरळातील बहिणी आणि मित्र नाराज आहेत.
मात्र मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, मी स्पष्ट करू इच्छीतो की, मी धर्म, क्षेत्र, लिंग, जात आणि समुदायावर आधारीत भेदभावात विश्वास करत नाही, मी कुणाच्याही भावना दुखावण्याचा कधी प्रयत्नही केला नाही".
या अमानकारक वक्तव्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २० जानेवारी रोजी, आम आदमी पार्टीच्या कार्यालयात तोडफोड देखिल केली होती. कुमार विश्वास अमेठी मतदारसंघातून आम आदमी पार्टीकडून, राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 22, 2014, 18:13