Last Updated: Thursday, September 13, 2012, 17:45
www.24taas.com, चेन्नईतामिळनाडुतल्या कुडनकुलममधल्या अणुप्रकल्पाविरोधात इथल्या नागरिकांनी जल आंदोलन सुरू केलं आहे. अणूप्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावर समुद्रात हे आंदोलन सुरू आहे.
हा प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा अशी आंदोलकांची मागणी आहे. यातील काही आंदोलकांना अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. सोमवारी या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं होतं. संतप्त जनसमुदायावर नियंत्रण मिळवतांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्युही झालाय.
दरम्यान, कुडनकुलमच्या अणुभट्टीत इंधन लोड करण्यास स्थगिती द्यायला सुप्रिम कोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे ही अणुभट्टी कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्याच वेळी स्थानिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवं आणि त्याबाबत त्यांना संपूर्ण माहितीही दिली जायला हवी, असं मत कोर्टानं नोंदवलंय.
First Published: Thursday, September 13, 2012, 17:45