`तो माझा नवराच` आमदारबाईंची माघार! Lakshmi Gautam on her Husband

`तो माझा नवराच` आमदारबाईंची माघार!

`तो माझा नवराच` आमदारबाईंची माघार!
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

दिलीप वाष्र्णेयसोबत असणाऱ्या लिव्ह-इन संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यांपासून सपा आमदार लक्ष्मी गौतम यांनी माघार घेतली आहे. उलट आपण मंदिरात दिलीप वाष्ण्रेय याच्याशी लग्न केल्याची कबुली लक्ष्मी गौतम यांनी दिली.

मंदिरात लग्न केल्यापासून आम्ही सात वर्षं एकत्र राहात होतो. मात्र माझा नवरा मला मारहाण करत असे. दोन मुली झाल्यानंतर आणि मी आमदार झाल्यानंतरही मला त्यांचा मार खावा लागत असे. माझ्यावर सतत संशय घेत असल्यामुळे मला कायम घरात बंद करून ठेवलं जात असे. असं लक्ष्मी गौतम म्हणाल्या.

मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मी आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्या म्हणाल्या. माझ्या मुलींनाही मारलं जातं, असं आता लक्ष्मी गौतम यांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 23:58


comments powered by Disqus