विरोधकांच्या षडयंत्राचे शिकार लालू - राबड़ीदेवी,Lalu is innocent trapped by opposition- Rabri

विरोधकांच्या षडयंत्राचे शिकार लालू - राबड़ीदेवी

विरोधकांच्या षडयंत्राचे शिकार लालू - राबड़ीदेवी
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

माझ्या पतीविरूध्द कोणतेही सबळ पुरावे अथवा साक्षीदार नाहीत. विरोधकांनी षडयंत्र करून त्यांना फसविल्याचं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबड़ीदेवी यांनी म्हटलंय. आम्ही जनतेच्या दरबारात याचा निर्णय घेऊ. लालू यादव यांनी कोणतीही चूक केलेली नाही, जनतेलाही हे ठाऊक आहे.

आम्ही वरच्या कोर्टात याचिका दाखल करणार आहोत, तसेच या काळात पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादवच राहतील असंही त्यानी पुढं सांगितल.

राजद खासदार रामकृपाल यादव यांनी म्हटलंय की, भाजप आणि नीतीशकुमार यांनी लालू यादव यांना फसवलंय. जनता या दोघांना धडा शिकवेल. त्यांनीही लालू यादव निर्दोष असल्याचं आणि जनतेच्या दरबारात निर्णय घेण्यात येणार असल्याच सांगितले.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच २५ लाखांचा दंडही लावण्यात आलाय. यामुळे लालूप्रसाद यादवांच लोकसभेचं सदस्यत्त्व रद्द होईल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 17:35


comments powered by Disqus