लालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हुँ...!, lalu says aapse bada gunda mai...

लालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हूँ...!

लालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हूँ...!
www.24taas.com, नवी दिल्ली

आज दिवसभर ‘एफडीआय’च्या मुद्द्यावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. एका क्षणी ही चर्चा लालुंच्या भडकण्यामुळे जास्तच गरम झालेली दिसली.

लोकसभेत सुरु असलेल्या रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या चर्चेत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा एका वेळी अक्षरश: संयम सुटला आणि लालुंनी सरळसरळ एकाला धमकीच दिली. झालं असं की, संसदेमध्ये बोलण्यासाठी लालू उभे राहिले आणि एका सदस्यानं लालुंचं आणि सरकारचं साटंलोटं असल्याच्या घोषणा दिल्या... झालं... लालू चिडले...

‘तुमच्यापेक्षा जास्त गुंडगिरी मी करतो… तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करायचे का?’ असं म्हणत लालुंनी आपला संताप व्यक्त केला. लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांच्या अनुपस्थित काम पाहणारे करिया मुंडा यांनीही त्या सदस्याला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर बऱ्याच वेळानं गोंधळ थांबला आणि त्यानंतरच लालुंनी पुन्हा आपलं भाषण सुरू केलं. पण पुन्हा गोंधळ झालाच...

First Published: Wednesday, December 5, 2012, 16:36


comments powered by Disqus