नीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद Lalu slams nitishkumar

नीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद

नीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी NDAवर जोरदार टीका केली. NDA चं अस्तित्वच शिल्लक राहिलेलं नाही. सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच भूमिका महत्त्वाची राहिली आहे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये. सहपरिवार त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, तिस-या आघाडीबाबतच्या हालचालींना वेग आलाय. ममता बॅनर्जी यांनी याचसंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांशी फोनवरून चर्चा केलीय. मोदींच्या प्रमोशनमुळं जेडीयू आणि भाजपमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 18:59


comments powered by Disqus