अधिवेशनाचा शेवटचा दिवस..., last day of session

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस...

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस...
www.24taas.com, नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळानं गाजलेल्या या अधिवेशनात आजही कामकाज होण्याची शक्यता कमीच आहे.

गेली १२ दिवस संसदेचं पावसाळी अधिवेशन होऊ न शकल्यानं कोट्यवधी रूपयांचा चुराडा झालाय. तसंच अनेक महत्त्वाची विधेयकही मंजूर होऊ शकलेली नाहीत. आजही कोळसाकांडाचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. कोळसा गैरव्यवहारप्रकरणी आज एनडीएच्या वतीनं संसदेबाहेर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच अधिवेशनाची समाप्ती झाल्यानंतर कोळसा गैरव्यवहाराच्या मुद्यावर जनजागृतीसाठी भाजपनं त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या सभांचा जम्बो कार्यक्रम आखलाय.

First Published: Friday, September 7, 2012, 09:46


comments powered by Disqus