Last Updated: Wednesday, November 7, 2012, 13:16
www.24taas.com, दिसपूर भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील एक खळबळजनक गोष्टीचा खुलासा झाला आहे. स्वर्गीय गायक भूपेन हजारिका यांची पत्नी प्रियंवदा पटेल या गोष्टीचा खुलासा केला आहे की, लता मंगेशकर आणि आसामचे प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांचे प्रेमसंबंध होते.
प्रियंवदा सध्या कॅनडात वास्तव्यास आहे. भूपेन हजारिका यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्याने आसाममधील एका कार्यक्रमात आसाममध्ये आल्या होत्या. प्रियंवदा यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत देताना लता मंगेशकर आणि भूपेन यांच्यात संबंध असल्याचा दावा केला आहे.
प्रियंवदाने हजारिका यांच्याशी घटस्फोट का घेतला याचं कारणही सांगितलं. लता मंगेशकर यांच्याशी असणाऱ्या संबंधामुळेच त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रियंवदा यांच्यामते लता मंगेशकर जेव्हा कधी कोलकातामध्ये येत असे तेव्हा हजारिका यांच्या तीन बेडरूमपैकी एक बेडरूम शेअर करीत असें. एकदा प्रसिद्ध संगीतकार कल्याणी जी आणि आनंद जी यांनी लता मंगेशकर यांना समजवले होते की, भूपेन येईपर्यंत त्यांच्या बेडरूममध्ये थांबणं बेकार आहे. त्यांनी सांगितलं होतं की, तू झोपून घे.. भुपेन काही येणार नाही. मात्र प्रियंवदा यांनी केलेले खुलासे अगदीच खळबळजनक असल्याने यांचे परिणाम मात्र वेगळे होतील.
First Published: Wednesday, November 7, 2012, 13:09