Last Updated: Saturday, May 17, 2014, 22:43
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले. या निकालातील उल्लेखनीय विजय म्हणजे वायएसआर काँग्रेसच्या उमेदवार आणि दिवंगत नेत्या शोभा नागी रेड्डी यांचा...
आंध्रेप्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यातील अलगड्डा विधानसभा मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या नेत्या शोभा रेड्डी यांचा गेल्या महिन्यात निवडणूक प्रचाराच्या धामधुमीदरम्यानंच 24 एप्रिल रोजी एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता... वायएसआर काँग्रेस मान्यताप्राप्त पक्ष नसल्यानं निवडणूक आयोगानं निवडणुका रद्द करण्यास नकार दिला. शोभा यांच्या नावाचं बटण मतदान यंत्रावर यापूर्वीच बसवण्यात आलंय, असं स्पष्ट करत निवडणूक आयोगानं या जागेवर रेड्डी निवडून आल्या तर पुन्हा निवडणुका घेण्यात येतील, असं स्पष्ट केलं.
शोभा रेड्डी त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पतीनं आणि मुलांनी त्यांचा प्रचार केला आणि सहानुभुतीची एक लाट मृत शोभा रेड्डी यांना मिळाली... त्या या मतदारसंघातून निवडून आल्यात. त्यांनी तेलगु देशम पार्टीच्या प्रभागर रेड्डी यांना जवळजवळ 18,000 मतांनी पछाडलं. आता, या विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 17, 2014, 22:43