संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प, Left government insistence on FDI issue: BJP

संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प

संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प
www.24taas.com, नवी दिल्ली

एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेचे सलग चार दिवस कोणतेही कामकाज होवू शकलेले नाही.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) आणि इतर विषयांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आली आहे. एफडीआय`वर चर्चा करावी आणि त्यानंतर मतदान घ्यावे, या मागणीवर भाजप ठाम आहे.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी गदारोळ घालण्यास सुरवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी सदस्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले. परंतु, गदारोळ सुरूच होता. त्यामुळे लोकसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली.

राज्यसभेत भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि व्यंकय्या नायडू यांनी प्रश्नोेत्तराचा तास मागे घेऊन एफडीआयवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. चर्चेची मागणी करण्यात आली. त्यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाल्याने कामकाजात बाधा आली.

First Published: Tuesday, November 27, 2012, 13:04


comments powered by Disqus