निर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’, less production of aakash than demand

निर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’

निर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’
www.24taas.com, नवी दिल्ली

विद्यार्थ्यांसाठी स्वस्त टॅबलेट म्हणून गाजावाजा करण्याता आलेल्या ‘आकाश’ या टॅबलेटचा पुरवठा जेव्हढ्या प्रमाणावर व्हायला हवा तेवढ्या प्रमाणात तो झालेला नाही, असं आता उघड झालंय. वेळेत पुरवठा न झाल्यास ‘डेटाविंड’वर कारवाई करणार असं केंद्र सरकारनं म्हटलंय.

केंद्र सरकारनं मुंबई आयआयटीला लिहिलेल्या एका पत्रात हा खुलासा केलाय. आयआयटी मुंबईकडे आकाश टॅबटलेच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम देण्यात आलं आहे. परंतू, या टॅबलेटसची निर्मिती करणारी कंपनी या टॅबलेटसचा पुरवठा वेळेत करू शकली नाही तर हा उपक्रम नेमका कुणाला उपयोगी ठरणार? असा प्रश्न आता विचारला जातोय.
आकाश टॅबलेटच्या पुरवठा ३१ मार्चपर्यंत करण्याची सूचना पत्रात देण्यात आली आहे. आकाश टॅबलेट कंपनीची निर्मिती डेटाविंड नावाची कंपनीकडून केली जात आहे. जर कंपनी निर्मितीकडून वेळेत टॅबलेटचा पुरवठा झाला नाही, तर कंपनीवर कारवाई होऊ शकते, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. हा टॅबलेट ११३० रूपयांत विद्यार्थ्यांना देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. डेटाविंड सुरूवातीला एक लाख आकाश टॅबलेटसचा पुरवठा करणार होती. मात्र ही गरज डेटाविंडकडून अजूनही पूर्ण झालेली नाही.

या टॅबलेटचं भविष्य निश्चित करण्यासाठी मंत्रालय राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालाची वाट पाहणार आहे

First Published: Saturday, March 23, 2013, 13:14


comments powered by Disqus