केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रपती राजवटीला मंजुरी, Union Cabinet approves President`s rule in Delhi

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं ही शिफारस राष्ट्रपतींकडे धाडलीय.

तसंच, पुढील सहा महिन्यांच्या आत दिल्लीत पुन्हा निवडणुका घेण्याची सुचनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं केलीय. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडली.

याअगोदर, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केली होती. केंद्रीय गृहखात्याला पत्र लिहून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलीय. राज्यपालांच्या या शिफारसीवर आता केंद्रीय गृहमंत्रालय विधी खात्याचा सल्ला घेणार आहे. त्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का याचा निर्णय होणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 20:12


comments powered by Disqus