काँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन, Loksabha Election on Congress meet

काँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन

काँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.

काँग्रेसमध्ये दिग्विजय सिंग, गुरूदास कामत, अजय माकन, शकील अहमद, संजय निरूपम,प्रिया दत्त हे कॉग्रेसचे सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. तर जयराम रमेश,जयंती नटराजन पक्षात काम करण्यासाठी पुढे येऊ शकतात. १७ जानेवारी रोजी कॉग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. त्याआधी पक्षात हे मोठे बदल होणार आहेत.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी प्रियंका गांधींनी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते. प्रियंका गांधींनी बोलावलेल्या या बैठकीत अहमद पटेल, जयराम रमेश, जनार्दन द्विवेदी, मधुसुदन मिस्त्री, अजय माकन हे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या १७ जानेवारीला होणा-या निर्णयाआधीची ही महत्वाची बैठक असल्याचं सांगण्यात येतंय.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 18:13


comments powered by Disqus