धावत्या ट्रेनमध्ये ओळख अन् तिथेच झाले लग्न, Love marriage the train Delhi Aligarh

धावत्या ट्रेनमध्ये ओळख अन् तिथेच झाले लग्न

धावत्या ट्रेनमध्ये ओळख अन् तिथेच झाले लग्न
www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीहून रेल्वेने प्रवास करताना दोघांना नव्हती एकमेकांची ओळख... दीड तासांचा अलिगढपर्यंतचा प्रवासात फिल्मी स्टाईलमध्ये झाले प्रेम.... आयुष्यभर एकत्र राहण्याच्या खाल्या आणाभाका.... चालत्या ट्रेनमध्येच घेतला लग्न करण्याचा निर्णय.... फिल्मी स्टाइलमध्ये युवकाने युवतीच्या मांगमध्ये सिंदूर भरला... सहयात्रींच्या साक्षीने झाले या दोघांचे लग्न.... या अजब लग्नाची गजब गोष्ट घडली दिल्ली अलिगढ प्रवासात....

चित्रपटात शोभेल अशी ही एका लग्नाची गोष्ट घडली पूर्वी एक्स्प्रेसच्या एस थ्री कोच मध्ये.... दिल्लीहून अलिगढकडे रेल्वे रवाना झाली तेव्हा एका युवकाची एका युवतीशी ओळख झाली. काही स्टेशन पुढे गेल्यावर अलिगढपर्यंत प्रेम झाले.

लग्नाचा प्रस्ताव कोणी ठेवला आणि कोणी स्वीकारला हे कळाले नाही. पण दोघांनीही चालत्या ट्रेनमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून युवकाने सिंदूर मागितला आणि तरुणीच्या डोक्यात भरला. यावेळी एका सहयात्रीने पंडित बनून मंत्रपठण केले आणि नव विवाहितांना आशीर्वाद दिला.

या विवाहाबद्दल मीडियाला समजताच मीडियाचे काही प्रतिनिधी टुंडला रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. मीडिया या ठिकाणी पोहचल्यावर नवविवाहित दाम्पत्य रेल्वेच्या सीट खाली लपले. पण काही प्रवाशांच्या सांगण्यानंतर दोघे बाहेर आले.

या दोघांनी मीडियाशी बोलणे टाळले. युवतीने सांगितले की माझे लग्न झाले आहे. परंतु कोचमधील एका प्रवाशाने या दोघांचे लग्न झाल्याचे स्पष्ट केले. युवक लखनऊचा आहेत पण युवती कुठली आहे, हे समजू शकले नाही.

First Published: Wednesday, December 12, 2012, 20:30


comments powered by Disqus