एलपीजी गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा सुरू, LPG connection portability extended to 480 districts,

एलपीजी गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा सुरू

एलपीजी गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा सुरू
www.24taas..com, झी मीडिया, नवी दिल्ली

तुम्ही गॅस नोंदवूनही घरी आला नाही. प्रत्येकवेळी तुम्हाला गॅससाठी खेपा माराव्या लागत आहेत. किंवा गॅस वितरकांकडून तुम्हाला नेहमी त्रासाला सामोरे जावे लागत आहे का? आता यातून तुमची सुटका होणार आहे. कारण बुधवारपासून गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा लागू करण्यात आली आहे. ४८० जिल्ह्यात नव्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. कालांतराने संपूर्ण देशात ही सेवा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जी कंपनी चांगली सेवा देते त्याचा ग्राहक होण्याची संधी तुम्हाला मिळेल.

गॅस सिलिंडरची सेवा चांगली मिळत नसेल तर ग्राहकाला आपला गॅस वितरक बदलण्याचा अधिकार राहणार आहे. अनेकवेळा सिलिंडर देण्यासाठी वितरकांची मनमानी असते. या मनमानीला आता चाप बसणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याआधी २४ १३ राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये गॅस कनेक्शन पोर्टेबिलिटी सेवा लागू केली होती. बुधवारी यामध्ये वाढ करण्यात आली असून ४८० जिल्ह्यात ही सेवा सुरु केली आहे. बुधवारी या सेवेचा प्रारंभ पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केला.

दूरसंचार निगमने याआधी मोबाईलसाठी पोर्टेबिलिटी सेवा सुरू केली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता गॅस सिलिंडर कनेक्शन मोबाईलप्रमाणे बदलता येणार आहे. त्यामुळे गॅसच्या मनमानीला चाप बसून ग्राहकाला सांगितल्यानंतर चांगली सेवा मिळेण्याची शक्यता आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 12:17


comments powered by Disqus