गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार, LPG price hiked by Rs 11.42 per cylinder

गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार

गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार
www.24taas.com,नवी दिल्ली

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढणार आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत ११ रुपये ४२ पैशांनी वाढ होणार आहे. डिलर्सच्या कमिशनमध्ये तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाल्यानं ही दरवाढ होतेय.

सबसिडी नसलेल्या गॅसचे दरही यामुळे वाढणार आहेत. याखेरीज पेट्रोल आणि डिझेलच्या कमिशनमध्येही अल्प वाढ करण्याचा मुद्दा विचाराधीन असल्यामुळे गॅसपाठोपाठ या इंधनांचे दरही भडकण्याची भीती आहे.

गॅस वितरकांच्या कमिशनमध्ये ११.४२ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, हा बोजा सरकारने सामान्य ग्राहकांच्या माथी मारला आहे. सरकारने अनुदानित सिलिंडरच्यार संख्ये२वर मर्यादा आणल्यातनंतर वितरकांनी कमिशनमध्‍ये वाढ करण्याची मागणी केली होती.

या मागणीसाठी वितरकांनी ग्राहकांना वेठीस धरले होते. सिलिंडर घरपोच न देण्याचचे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनही करण्यातत आले होते. परंतु, अनेक ठिकाणी वितरकांनी घरपोच डिलिव्हेरी देणे बंदच केल्या चे प्रकार सुरु झाले. त्या,मुळे सरकारने कमिशन वाढविण्या चा निर्णय घेतला. परंतु, ही वाढ नेहमीप्रमाणे ग्राहकांनाच सोसावी लागणार आहे.

First Published: Saturday, October 6, 2012, 17:01


comments powered by Disqus