दिल्लीतील हल्ल्याचा कट उधळला, लष्करचा हस्तक अटकेत, Lshkr-e-Toiba`s terrorist attack in New Delhi

दिल्लीतील हल्ल्याचा कट उधळला, लष्करचा हस्तक अटकेत

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी हाणून पाडला. लष्कर ए तयबाचा सदस्य मोहम्मद शाहिद याला पोलिसांनी अटक केली. त्याकडून महत्वाची माहिती हाती आली आहे.

दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये लष्कर ए तयबा या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरवून, दिल्लीत हल्ला करण्याचा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळवून लावला. या प्रकरणी हरियाणातील मेवात येथीलमोहम्मद शाहिद याला अटक करण्यात आली आहे.

शाहिदने दोनवेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्याच्या डायरीमध्ये दिल्लीमधील हल्ल्याच्या योजनेचे पुरावे सापडले आहेत. शाहिदचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. लष्कर ए तयबाचा कमांडर जावेद बालुची हा यांचा मार्गदर्शक असल्याचे समोर येत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 11:32


comments powered by Disqus