Last Updated: Tuesday, November 27, 2012, 16:49
www.24taas.com,नवी दिल्लीजम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान वैष्णोदेवी. आता हे देवस्थान टार्गेट करण्याचा कट दहशतवाद्यांनी केला आहे. दहशतवादी अजमल कसाबला दिलेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा कट आहे. तसा ई-मेल केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा करणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
लष्कर-ए-तोयबाने वैष्णोदेवी यात्रेचा बेसकॅम्प असलेल्या कतरा येथील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकीचा मेल पाठविला आहे. मुंबईच्या २६-११ हल्ल्यातील आरोपी कसाबला दिलेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी वैष्णोदेवी गुंफेला निशाणा करण्याचा बेत आखला आहे, असा उल्लेख लष्कर-ए-तोयबाच्या ई-मेलमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एका हॉटेलचे मालक यांना २४ नोव्हेंबरला ‘कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी वैष्णोदेवी यात्रेला लक्ष्य करू’, हा धमकी देणारा इमेल पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या मेलची चौकशी सुरू आहे. ही धमकी खोटी आहे अथवा दहशतवादी संघटनेकडून पाठवण्यात आली आहे याची खातरजमा करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
First Published: Tuesday, November 27, 2012, 16:49