एफडीआयसाठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!, maharashtra is hot destination for FDI

'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!

'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!
www.24taas.com, नवी दिल्ली

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ‘एफडीआय’ म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीसाठीही हॉट डेस्टिनेशन ठरलाय. एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ६१.१३ अब्ज डॉलर एवढी परकीय गुंतवणुक नोंदविण्यात आलीय.

उद्योग मंत्रालयानं नुकतीच एफडीआयची काही आकडेवारी जाहीर केलीय. यामध्ये दिल्लीतील `नॅशनल कॅपिटल रीजन` (एनसीआर) मध्ये एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात ३५.४ अब्ज डॉलर गुंतवणूक झालीय. या गुंतवणुकीचं प्रमाण एकूण एफडीआयच्या १९ टक्के इतकं आहे. म्हणजेच, महाराष्ट्र आणि एनसीआर या दोन भागांत निम्म्याहून अधिक परकीय गुंतवणूक झालीय. दोन्ही राज्यांत पायाभूत सुविधेत झालेली वाढ हे परकीय गुंतवणूक वाढण्यामागचं प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया व्यापार क्षेत्रातून उमटतेय.

एक नजर टाकुयात एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत विविध राज्यांत झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीवर...

भारत - १८५.७ अब्ज डॉलर (संपूर्ण देशातील गुंतवणूक)
महाराष्ट्र - ६१.१३ अब्ज डॉलर
एनसीआर - ३५.४ अब्ज डॉलर
कर्नाटक - १०.२५ अब्ज डॉलर
तमिळनाडू - ९.६ अब्ज डॉलर
गुजरात - ८.५३ अब्ज डॉलर
आंध्र प्रदेश - ७.४१ अब्ज डॉलर
पश्चिम बंगाल - २.०४ अब्ज डॉलर

First Published: Tuesday, January 8, 2013, 13:25


comments powered by Disqus