Last Updated: Thursday, September 26, 2013, 23:53
देशातल्या विकसित राज्यांच्या यादीत गोव्यानं सर्वात वरचा क्रमांक पटकावलाय. तर केरळनं दुसरा स्थानावर झेप घेतलीय. या यादीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. देशातल्या सर्वात जास्त विकसित राज्यांमध्ये सात राज्यांची गणना करण्यात आलीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विकासाच्या नावानं डंका पिटणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातला पहिल्या सातमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आलंय.
देशात गुजरात बाराव्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी विकसित राज्यांमध्ये 10 राज्यांचा समावेश करण्यात आलाय. यात बिहार, ओडिशा, मध्य-प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान उत्तर प्रदेश आणि झारखंडचा समावेश करण्यात आलाय. देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या समितीनं तयार केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झालीये.
या समितीनं आपला अहवाल आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना हा अहवाल सादर केला. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे आल्यानंतर राजन समिती नेमण्यात आली होती. आता या अहवालामुळे बिहारसह काही राज्यांना विशेष दर्जा मिळण्याची शक्यता बळावली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 26, 2013, 23:53