किंगफिशर खड्ड्यात, मल्ल्या पितापुत्र अड्ड्यात Malyas enjoying while kingfisher suffers

किंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी

किंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी
www.24taas.com, नवी दिल्ली

सरकारनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे पंख छाटले खरे मात्र याचा मल्ल्या परिवारावर काहीही फरक पडलेला नाही. किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करणा-या हजारो कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. मल्ल्या पिता-पुत्र मात्र परदेशात 2013 च्या दिनदर्शिकेसाठी नव्या दमाच्या मदनिकांच्या निवडीसाठी परदेशात आहेत.

कंपनीचे सर्वेसर्वा विजय मल्ल्यांनी 2003 मध्ये किंगफिशर एअरलाईन्सची स्थापना करून आपल्या लाडक्या पुत्राला म्हणजे सिद्धार्थला भेट दिली होती. आता ही कपंनी खड्ड्यात जात असताना मल्ल्यापुत्र मात्र लंडनच्या पबमध्ये मग्न आहे. यावर कळस म्हणजे लंडनच्या पबमध्ये जाण्यासारखं दुसरं सुख नाही अशी निर्लज्ज प्रतिक्रिया देखील सिद्धार्थ मल्ल्य़ानं ट्विटरवर टाकलीय.

कंपनीचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या तर 30 सप्टेंबरपासून भारतात फिरकलेलेच नाही. त्यामुळं किंगफिशरच्या कर्मचा-यांचा संताप झालाय.

First Published: Monday, October 22, 2012, 15:01


comments powered by Disqus