Last Updated: Sunday, September 16, 2012, 15:05
www.24taas.com, कोलकता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगून युपीएला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे आज स्पष्ट झाले.
एफडीयाला ममतांनी तीव्र विरोध केला आहे. त्यांनी युपीएला अल्टीमेटम दिला आहे.मात्र, केंद्रातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. याबाबत रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी स्पष्ट केले की, तृणमूलचे केंद्रीय मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. युपीएचा पाठिंबा कायम ठेवण्यावर ममता बॅनर्जी यांना समजावणे शक्यं नाही. त्यामुळे युपीएला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
डिझेल दरवाढ आणि अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर युपीएला दिलेल्या पाठिंब्यावर कठोर निर्णय घेतला जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. त्यासाठी त्यांनी ७२ तासांची मुदत दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकार झुकणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
First Published: Sunday, September 16, 2012, 15:05