Last Updated: Tuesday, January 22, 2013, 11:35
www.24taas.com, केनिंग (पं. बंगाल)प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रने कर्जाच्या नावाखाली जवळजवळ २६ हजार करोड रूपये आमच्या राज्याकडून घेतो. तर अशा परिस्थितीत मी राज्य तरी चालवू कसं? यापुढे मी केंद्राला कर्जांची रक्कम घेऊ देणार नाही. राज्याला आर्थिक पॅकेजची आता खरी गरज आहे. मी दहा दहा वेळा पंतप्रधानांना सांगून झालं आहे. मात्र माझं कोणीच ऐकून घेत नाहीये.. मी २०११, २०१२ मध्ये आर्थिक पॅकेजसाठी पंतप्रधानांना भेटलीही होती, बोला आता मी काय करू? आता काय पंतप्रधानांना मारू?
काँगेसने त्यांच्या या प्रतिक्रियेचा चांगलाच निषेध केला आहे. काँग्रेसने म्हटंल आहे की, पंतप्रधानांनबाबत असे बोलणे योग्य नाही, त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. तर मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी दावा केला आहे की, केंद्र सरकारने एफडीआय आणि डिझेलच्या किमतीबाबत घेतलेले निर्णय यासारख्या निर्णयामुळे जनविरोधी भावना निर्माण झाल्या आहेत.
बॅनर्जी म्हणाल्या की, आमच्या राज्यात आम्ही एफडीआय, डिझेल किंमतीत वाढ, गॅस दरवाढ यासारख्या जनविरोधी अशा गोष्टींना अजिबात मान्यता देणार नाही.
First Published: Tuesday, January 22, 2013, 11:33