Last Updated: Thursday, September 20, 2012, 20:43
www.24taas.com, कोलकाताकेंद्र सरकारकडून फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. कोलकात्यामधील पत्रकार परिषद घेऊन फोन टॅप केल्याचा दावा केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे मंत्री उद्या राजीनामा देणार आहेत. मात्र यामध्ये कुठलीही सौदेबाजी झाली नाही असं स्पष्टीकरण ममता बॅनर्जींनी दिलं आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून वेळ मिळाल्यानंतर तृणमूलचे नेते त्यांना यूपीए सरकारमधून पाठिंबा काढल्याचं पत्र सुपूर्द करतील, असंही ममतांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जींच्या या भूमिकेमुळं केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातली दरी वाढत असल्याचं चित्र आहे.
First Published: Thursday, September 20, 2012, 20:25