मीडियामुळे होतायेत बलात्कार - ममता बॅनर्जी , mamta banrjee blame on media

मीडियामुळे होतायेत बलात्कार - ममता बॅनर्जी

मीडियामुळे होतायेत बलात्कार - ममता बॅनर्जी
www.24taas.com, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये बलात्कारांच्या घटना वाढल्याने सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याचे खापर मीडियावर फोडले आहे.

प्रसार माध्यमांमुळे बलात्कार आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य करून ममतांनी रविवारी मीडियाला टार्गेट केले. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या रॅलीत ममता बॅनर्जी बोलत होत्या.

प्रसार माध्यमांची मालकी व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे असल्यामुळे ते हवे तसे वृत्त ते देत असतात. 50 हजार ते 1 लाख रुपयांमध्ये हवे ते छापता येते अथवा नको असलेले वृत्त मागेही घेता येते, असे राज्याचे शहर विकासमंत्री फरहाद हकीम यांनी सांगितल्याचे ममतांनी म्हटले.

First Published: Sunday, August 26, 2012, 23:54


comments powered by Disqus