नशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले man abuse an air hostess in air india plane

नशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले

नशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

न्यू यॉर्कमधून नवी दिल्लीला येत असलेल्या, एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एक धुंध असलेल्या प्रवासीला, एअरहॉस्टेससोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाबाबत पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी सांगितलं की, `इंदिरा गांधी इंटरनेशनल विमानतळाच्या पोलीस स्टेशनमध्ये हे छेडछाडीचं प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. आरोपी प्रवाशाला अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं आहे. ही घटना न्यू यॉर्कच्या जेएफके विमानतळावरून उडालेल्या एआई-१०२ विनामात घडली. विमानात आरोपी यात्री हा आधीपासूनच दारूच्या नशेत होता. विमानात त्याने अजून दारूची मागणी केली.

यानंतर हा आरोपी एअरहॉस्टेसच्या मागे गेला आणि गॅलरीत जाऊन त्याने एअरहॉस्टेसशी असभ्य संभाषण केले. याच वेळी त्याने एअरहॉस्टेसशी अश्लील वर्तन देखिल केलं. एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, घटनेनंतर कमांडरने दिल्लीला पोहचल्यानंतर आरोपी यात्रीस `सीआयएसएफ`च्या हवाली केलं आणि `सीआईएसएफ`ने आरोपीस पोलीसांच्या ताब्यात दिलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 14:11


comments powered by Disqus