Last Updated: Monday, August 19, 2013, 16:23
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदेशाच्या राजधानीत होणाऱ्या महिलांच्या अत्याचारांच्या घटना अनेकवेळा ऐकायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे घडली. एका तरुणाने दिल्लीमध्ये १५ हजार रुपयांमध्ये मुलीची खरेदी करून तिच्यावर पुढील १२ दिवस बलात्कार केला. शनिवारी पोलिसांना या मुलीचा शोध लागला. मुलीच्या कुटुंबियांकडे या मुलीला सोपवण्यात आलं.
अलिगढ येथील रामपूर गावात एका तरुणाने दिल्लीवरून मुलगी आणल्याची बातमी गावकऱ्यांना समजली. तिला घरातच कोंडून ठेवल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. मूळच्या रामपूरच्या असणाऱ्या तरुणाने दिल्लीमध्ये १५ हजार रुपयांमध्ये ही मुलगी विकत घेतली होती या मुलीचं अपहरण झालेलं होतं. मुलगी खरेदी करून तरुण तिला आपल्या गावी घेऊन आला. तिथे मुलीला इंजेक्शन देऊन त्याने बेशुद्ध केलं. आणि पुढील १२ दिवस तिच्यावर बलात्कार करत राहीला.
आरोपी तरुणाला अटक केल्यावर दिल्लीमध्ये मुलीची विक्री करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमध्ये चांगल्या घरातल्या मुलींना पळवून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा यामागे हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक तपासणी करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 19, 2013, 16:23