माणिकरावांचा `ठाकरी` राग Manikrao Thackeray slams Bihar Secretary

माणिकरावांचा `ठाकरी` राग

माणिकरावांचा `ठाकरी` राग

www.24taas.com, मुंबई

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ठाकरी राग आळवलाय. सीएसटी हिंसाचार प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणा-या बिहार राज्याच्या सचिवानं मोठी चूक केल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय.

बिहार सचिवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तोफ डागल्यानंतर मोठं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. आणि आता राज ठाकरेंपाठोपाठ माणिकराव ठाकरेंनीही बिहारच्या सचिवावर आक्षेप घेतलाय.

दुस-या राज्यात पोलीस कारवाईसाठी गेले तर त्याठिकाणच्या पोलिसांना सूचना देण्याचे संकेत आहेत, तसा कायदा नाही. परंतु बिहारच्या सचिवांनी कडक भाषेत पत्र लिहिणं पूर्णपणे चूक असल्याचं माणिकराव ठाकरेंनी म्हटलंय.

First Published: Monday, September 10, 2012, 21:32


comments powered by Disqus