जोशी भेटले मोदींना, राज्यसभेवर डोळा! Manohar Joshi Meets Narendra Modi about Rajyasabha seat

जोशी भेटले मोदींना, राज्यसभेवर डोळा!

जोशी भेटले मोदींना, राज्यसभेवर डोळा!
www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर

शिवसेनेचे माजी खासदार डॉ. मनोहर जोशी यांनी आता पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. जोशीसरांनी आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गांधीनगरमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली.

राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा मिळवण्यासाठीच जोशींनी मोदींना गळ घातल्याचं समजतंय. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही दिल्लीत भेट घेतली होती. राज्यसभेच्या पटांगणात उतरायचं म्हणूनच जोशींनी शिवसेना नेतृत्वापुढं लोटांगण घातल्याचं सांगितलं जातंय.

राज्यसभेच्या सातव्या जागेचे उमेदवार म्हणून आखाड्यात उतरण्याची जोशींची इच्छा असून, ही जागा निवडून आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांची मदत घेण्याची तयारी जोशींनी चालवलीय.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक मतं, मनसेची मतं आणि अपक्षांचा पाठिंबा या जोरावर आपण सातव्या जागेवर निवडून येऊ, अशी जोशीसरांना खात्री आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 22:35


comments powered by Disqus