Last Updated: Saturday, December 8, 2012, 09:16
www.24taas.com, नवी दिल्लीमराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुढे आला आहे. आता थेट हा मुद्दा संसदेत गेला आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मांडला आहे. त्यांनी लोकसभेत ३ डिसेंबरला विचारलेल्या एका प्रश्नाच्या आधारे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं, यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्गीय आय़ोगाच्या सल्ल्यासाठी पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारला मिळाला आहे. तो २७ एप्रिल २०१२ रोजी राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगकडे पाठवल्याचे खा. शेट्टींना देण्यात आलेल्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाविषय़ी केंद्रातही हालचाली सुरू असल्याचं या निमित्ताने पुढे आले आहे.
First Published: Saturday, December 8, 2012, 09:00