march of lawyers against mamta banerjee- 24taas.com

ममता दिदींविरुद्ध वकिलांचा मोर्चा

ममता दिदींविरुद्ध वकिलांचा मोर्चा

www.24taas.com, कोलकाता

कोलकत्यामधल्या वकीलांनी न्यायव्यवस्थेवरील ममता बॅनर्जी यांच्या कथित वक्तव्याचा रस्त्यावर उतरून निषेध केला. पोस्टर घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या वकीलांनी ममता यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

योग्य निर्णय देण्याऐवजी पैशांच्या बदल्यात न्यायवस्थेकडून अनेक खटल्यांचे निकाल येत असल्याचं विधान ममता यांनी केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी वकील रस्त्यावर उतरले होते..

न्यायव्यवस्थेवरील वादग्रस्त विधानामुळं टीकेचं लक्ष्य ठरलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनजी यांनी स्वतःचा बचाव केलाय. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं ममतांनी म्हटलंय. निवडणुका, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेतल्या सुधारांबाबत वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हटलंय. देशात अशारीतीने चूका दाखवणे गुन्हा असेल तर तो हजार वेळा करण्यास तयार असल्याचं ममतांनी म्हटलंय.

First Published: Friday, August 17, 2012, 08:04


comments powered by Disqus