Last Updated: Wednesday, October 24, 2012, 10:56
www.24taas.com, अमृतसरदेशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यांचं आणि वयाचंही भान न ठेवता होत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. आपल्या मित्रांसोबत आपल्याच प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली. आता अमृतसरमध्येही अशीच एक घटना घडली आहे.
वर्गातल्या मुलीवर प्रेम असलेल्या अमृतसरमधील योगेश नामक मुलाने मैत्रिणीच्या आई-वडिलांकडे लग्नाची मागणी घातली. मात्र या आंतरजातीय विवाहाला मुलीच्या पालकांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून योगेशने त्या मुलीवर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश संबंधित मुलीला घेऊन हॉटेलमध्ये गेला आणि तिथे तिच्यावर त्याने बलात्कार केला. पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.
First Published: Wednesday, October 24, 2012, 10:56