चालत्या कारमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कारMarried Delhi woman gang-raped in moving car

चालत्या कारमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार

चालत्या कारमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, गाझियाबाद

देशात सामूहिक बलात्काराच्या घटना सुरूच आहेत. दिल्लीजवळील गाझियाबाद इथं एका २५ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चालत्या कारमध्ये चार नराधमांनी या महिलेवर बलात्कार केल्याचं कळतंय.

अरताला इथल्या एका दर्ग्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी आलेल्या या विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यानंतर आरोपींनी या महिलेला घटनास्थळीच सोडलं आणि चारही नराधम पसार झाले. विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनुसार सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याचं पीडित महिलेनं स्पष्ट केलंय.

या विवाहितेच्या घरमालकाचा मुलगा हेमंत आणि लाला हे दोघे अन्य दोघांसह आपला पाठलाग करत होते, असं तिनं आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ती परतत असताना एकटीच असल्याचं पाहून त्यांनी तिला आपल्या गाडीत ओढलं. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला हिंडॉन जवळ गाडीतून सोडण्यात आलं. घडल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही आरोपींनी या पीडित विवाहितेला दिली. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून याचा अहवाल अजून यायचाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 27, 2013, 13:28


comments powered by Disqus