26/11 मास्टर माईंड डेव्हिड हेडलीला होणार शिक्षा, master mind 26/11 david headley

26/11 मास्टर माईंड डेव्हिड हेडलीला होणार शिक्षा

26/11 मास्टर माईंड डेव्हिड हेडलीला होणार शिक्षा
www.24taas.com, न्यूयॉर्क

अमेरीकी वंशाचा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हीड हेडली याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हेडलीचा सहकारी तहव्वूर राणा याला देखील शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हेडलीला 17 जानेवारीला तर राणा याला 15 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

शिकागोच्या न्यायालयाचे प्रवक्ते रॅन्डल सॅमबॉर्न यांनी ही माहिती दिलीय.26-11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सहभाग आणि डेन्मार्कमधील एका वृत्तपत्राच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी या दोघांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबरला 26/11 हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी कसाबला फाशी देण्यात आली होती.

आता या हल्ल्याचा मास्टरमाईंड हेडलीला शिक्षा सुनावण्यात येणार असल्यानं ख-या अर्थानं 26/11च्या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यास सुरवात झाली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

First Published: Thursday, November 29, 2012, 18:55


comments powered by Disqus