काँग्रेसचे घोटाळेबाज रशीद मसूदना चार वर्षांची शिक्षा, MBBS admission scam: Congress MP Rasheed Masood sentenced to 4 yea

काँग्रेसचे घोटाळेबाज रशीद मसूदना चार वर्षांची शिक्षा

काँग्रेसचे घोटाळेबाज रशीद मसूदना चार वर्षांची शिक्षा
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चारा घोटाळ्या प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना दणका बसल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे खासदार रशीद मसूद यांना दणका बसलाय. त्याच्या खासदारकी जाण्याबरोबर चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे.

वैद्यकीय भरती घोटाळा प्रकरणी रशीद मसूद यांना आज दिल्लीच्या तीसहजारी कोर्टानं चार वर्षांच्या जेलची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे त्यांची ४० वर्षांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्यात जमा आहे. पुढची सहा वर्षं निवडणूकही लढवू शकणार नसल्यानं काँग्रेससाठी हा मोठा दणकाच मानला जातोय.

चार वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर रशीद मसूद यांना लगेचच अटक करण्यात आली. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येणार आहे. राजदचे लालूप्रसाद यांच्यानंतर काँग्रेसला मोठा झटका आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 15:59


comments powered by Disqus