Last Updated: Monday, January 28, 2013, 19:24
www.24taas.com, नवी दिल्ली२६/११ चा गुन्हेगार अजमल आमिर कसाब याला फाशी देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचंही माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे. आणि त्याला फाशी देऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत, त्या समितीच्या अध्यक्षा आहेत, साक्षात् श्रीमती सोनिया गांधी.
मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार अजमल आमिर कसाब याला शिक्षा करण्यास उशीर होत असल्याची टीका सरकारवर वारंवार होत होती. सरतेशेवटी त्याला फाशी दिली गेली. मात्र त्यापूर्वी त्याला फाशी देऊ नये, अशी मागणी अरुणा रॉय आणि हर्ष मंदार या दोन व्यक्तींनी केली होती. या दोन्ही व्यक्ती राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि सोनिया गांधींच्या टीममधीलच या व्यक्ती आहेत.
अरुणा रॉय आणि हर्ष मंदार यांनीच कसाबच्या माफीसाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केला होता. २६/११च्या हल्लेखोरांधील वाचलेला एकमेव दोषी कसाब याला माफी द्यावी, अशी मागणी या दोन सदस्यांनी केली होती. राष्ट्रपतींकडे आलेल्या २०३ याचिकांमध्ये दोन माफीच्या ज्या याचिका होत्या त्या सोनिया गांधीच्याच टीम मेंबर्सनी दाखल केल्या होत्या. हे सर्व माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे.
First Published: Monday, January 28, 2013, 19:24