दिल्ली मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर, Metro MMS: DMRC urges people to behave

दिल्ली मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर

दिल्ली मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर
www. 24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत दिवसागणिक वाईट गोष्टींच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर उजेडात आले आहे. दिल्ली मेट्रोचा दुसरा MMS लिक करण्यात आला आहे. हा MMS पोर्न साईटवर लोढ करण्यात आलाय.

दिल्लीत याआधी मेट्रोत MMS तयार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास लागयाच्या आधी दुसरा MMS आल्याने गजब माजलाय. काही दिवसांपूर्वीच दिल्लीण मेट्रोमधील आपत्तीजनक MMS लिक झाल्याने मोठे वादळ उठले होते. हे वादळ क्षमण्याआधी दुसरे वादळ उठले आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोचे डर्टी पिक्चर सर्वांपुढे आले आहे.

आधीच चर्चेत असलेली दिल्ली मेट्रो पुन्हा या प्रकाराने चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोमधील नवा MMS पोर्न साईटवर टाकण्यात आला आहे. हा दुसरा MMS पोर्न साईटवर लोड करण्यात आल्याने याची गंभीर दखल दिल्ली मेट्रो प्रशासनाने घेतली आहे.

पोर्न साईटवर टाकण्यात आलेल्या या MMS मध्ये प्रेमीयुगूल नको त्या अवस्थेत दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाने (डीएमआरसी) मुख्य सुरक्षा आयुक्त यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली आहे. आता याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 24, 2013, 17:40


comments powered by Disqus