Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:35
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमुंबईमध्ये दिल्लीसारखी मेट्रो रेल्वे कधी सुरू होणार याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मंगळवारी नवी दिल्लीच्या मेट्रो रेल्वेमध्ये एक अनपेक्षित घटना घडली. केंद्रिय सचिवालय – हुडा सिटी सेंटर या रुटवर दिल्लीची मेट्रो ट्रेन सुमारे २ तास एका बोगद्यात अडकून राहिली.
मेट्रो ट्रेन २ तास बोगद्यात अडकल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मेट्रो ट्रेनचे दरवाजे बंदच होते. सुमारे दोन तासांनी प्रवाशांना इमरजंसी गेटमधून बाहेर काढण्यात आलं. यादरम्यान राजीव चौक मेट्रो स्टेशनवर गोंधळ उडाला होता. आधी अडकलेली ट्रेन बोगद्यातून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र यामध्ये यश न आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
अखेर ड्रायव्हरच्या जवळील डब्यात्या आपत्कालीन खिडकीमधून एक एक प्रवासी बाहेर काढण्यात येऊ लागला. त्यानंतर प्रवासी मेट्रोच्या रुटवरून चालत चालत परतले. ट्रेन अडकल्याने प्रवाशांपुढे कुठलाच मार्ग नव्हता. हेल्पलाइन नंबरही काम करत नव्हता. लेडिज कोचची वीजही बंद झाली होती. अशी तक्रार प्रवाशांनी केली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 16:35