हिंदूंविरोधी प्रक्षोभक भाषण: ओवैसीविरोधात गुन्हा दाखल MIM leader Akbaruddin Owaisi booked for hate speech

हिंदूंविरोधी भाषण: ओवैसीवर गुन्हा दाखल

हिंदूंविरोधी भाषण: ओवैसीवर गुन्हा दाखल
www.24taas.com, हैदराबाद

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम)चा खासदार अकबरुद्दीन ओवैसीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटने आज सर्व पुरावे लक्षात घेऊन उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनला ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटने आज सर्व पुरावे लक्षात घेऊन उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनला ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

MIMच्या अकबरुद्दीन ओवैसी या खासदाराविरोधात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कलम १५३ए (धार्मिक भावना भडकावणे) आणि २९५ए (जाणून बुजून कुठल्याही वर्गाच्या वा धर्माच्या लोकांच्या भावना भडकावणं) अंतर्गत ओवैसीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात येत आहे.

ओवैसी याने २४ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथे हिंदूंविरोधात प्रक्षोभक भाषण दिले होते. या प्रकरणी आधी कुठेही एफआयआर दाखल करण्यात आलं नव्हतं. मात्र या भाषणाच्या व्हिडिओ फुटेज मिळाल्यानंतर त्या न्यायालयात पुरावे म्हणून सादर करण्यात आल्या आणि ओवैसीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

First Published: Thursday, January 3, 2013, 16:29


comments powered by Disqus