हेमा मालिनी, माधुरी दीक्षितच्या गालांनी घालवलं मंत्रीपद Ministers` statement on actresses

हेमा मालिनी, माधुरी दीक्षितच्या गालांनी घालवलं मंत्रीपद

हेमा मालिनी, माधुरी दीक्षितच्या गालांनी घालवलं मंत्रीपद
www.24taas.com, लखनऊ

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याने भल्याभल्यांची झोप उडते. मात्र, या अभिनेत्रींच्या सौंदर्यामुळे एका मंत्रीमहोदयांचं मात्र करिअर झोपलं आहे. उत्तर प्रदेशचे खादी आणि ग्रामीण मंत्री राजा राम पांडे यांनी एका भाषणात प्रतापगडमधील रस्ते हेमा मालिनी आणि माधुरी दीक्षितच्या गालांसारखे बनवण्याचं अश्वासन दिलं होतं.

पांडेंच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली होती. यानंतर अखेर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी चर्चा करून पांडे यांना पदावरून काढून टाकलं आहे. या पदाचीही जबाबदरी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर आली आहे. अखिलेश यादव हे आधीपासूनच ६१ पदांचा कारभार पाहात आहेत.



पांडे यांची अशी वक्तव्यं करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सुलतानपूर येथे एका कार्यक्रमात महिला प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली होती. यावरूनही ते वादात अडकले होते.

First Published: Sunday, April 14, 2013, 16:53


comments powered by Disqus