Last Updated: Tuesday, March 5, 2013, 13:26
www.24taas.com ,आजमगढ ती घरात शांत झोपली होती. मात्र, घरात कोणी नसल्याचे पाहून एका तरुणाने घरात घुसखोरी केली आणि १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यात.
उत्तर प्रदेशातील रौनापार परिसरातील खासराजा गावात आपल्या घरी १५ वर्षांची मुलगी झोपली होती. यावेळी सरबजीत यादव हा युवक तिच्या घरात घुसला. त्यांने तिचा लैंगिक छळ केला. ही घटना काल (सोमवारी) घडली. हा प्रकार आज उजेडात आला.
ज्यावेळी सरबजीत यादव यांने अत्याचार सुरू केला. त्यावेळी पिडित मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे सरबजीत यांने तेथून पळ काढला. या लैंगिक छळाबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत, असल्याची माहीती पोलिसांनी पीटीआयला दिलीय.
First Published: Tuesday, March 5, 2013, 13:21