Last Updated: Monday, March 10, 2014, 17:36
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली दिल्लीतल्या नोएडा भागात एका नराधम बापानं क्रूरतेचा कळस गाठलाय. या बापानं आपल्याच १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता...
आठवीमध्ये शिकणाऱ्या आपल्याच मुलीला तिचाच जन्मदाता बाप पॉर्न सिनेमे दाखवत होता... आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता, अशी माहिती पीडित मुलीनं दिलाय.
एका समारंभासाठी पीडित मुलगी तिच्या मावशीच्या घरी गेली होती. मात्र, समारंभ संपल्यानंतर ती घरी जाण्यास मात्र तयार होत नव्हती. यामुळे, आईने तिला घरी न येण्याचं कारण विचारलं असता तिनं ही धक्कदायक गोष्ट कथन केली.
पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, आई कामावर गेल्यानंतर तिचाच नराधम बाप तिला पॉर्न सिनेमे दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होता. तिने विरोध केल्यावर तिला मारहाणही करत असे. यानंतर, मुलीच्या आईनेच पतीविरुद्ध तक्रार नोंदवलीय. मात्र, मुलीच्या आईने पतीविरोधात छेडछाडीची तक्रार नोंदवलीय त्यामुळे म्हणून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा फेटाळला आहे. पीडित मुलीच्या सांगण्यानुसार आरोपीची चौकशी सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 17:36