मुलीवर अत्याचार, MMS क्लीप बाजारात प्रसारित , mms clipping new delhi

मुलीवर अत्याचार, MMS क्लीप बाजारात प्रसारित

मुलीवर अत्याचार, MMS क्लीप बाजारात प्रसारित
www.24taas.com, नवी दिल्ली

मुलींवर होणारे अत्याचार आणि त्याला बळी पडणाऱ्या मुली यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललली आहे. अशीच घटना नवी दिल्लीमध्येही घडली आहे. मुलीची एमएमएस क्लीप पाठविण्याच्या आरोपाखाली २५ वर्षाच्या एका विद्यार्थ्याला तसेच त्याच्या दोन मित्रांना पकडण्यात आले आहे.

पकडल्या गेलेल्या तीन युवकांची ओळख पीङित मुलीचा प्रियकर रॉबिन (२५) तसेच त्याचे मित्र मंगत (२०) आणि टिंकू (२९) अशी आहे. पीङित मुलीने ११ सप्टेंबर रोजी आर्दश नगर पोलीस स्टेशन येथे संर्पक करून तक्रार दाखल केली होती. की, रॉबिन तिची एक एमएमएस क्लीप लोकांना पुरवित आहे.

पोलीस उपायुक्त पी. करूणाकरन यांनी सांगितले, पीडित मुलीची रॉबिनशी २०१० मध्ये मैत्री झाली आणि त्याने फूस लावून मित्राच्या घरी नेले, तिथे तिची काही आपत्तिजनक छायाचित्र रेकोर्ड केली. मात्र नंतर दोघांमधील संबंध खराब होत गेले आणि काही दिवसांपूर्वीच रॉबिनने पीङित मुलीला धमकी दिली होती.


First Published: Saturday, September 15, 2012, 12:25


comments powered by Disqus