तेजपाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात Mobile phone found in Tarun Tejpal cell

तेजपाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

तेजपाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

www.24taas.com, झी मीडिया, गोवा

तहलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल पुन्हा एकदा चांगलेच अडचणीत आले आहेत.

गोवामधील वॉस्को जेलच्या अधिकारांनी जेलची पाहणी केली असता, त्यांना ९ मोबाईल मिळाले.
आपल्याला ९ मोबाईल मिळाले आहेत. त्यामधील एक मोबाईल तरुण तेजपालच्या कोठडीतून मिळाला आहे, असे सहाय्यक जिल्हाधिकारी गौरीश शंखवलकर यांनी सांगितले.

पण तेजपाल सोबत अन्य ३ कैदी आहेत. त्यामुळे नक्की मोबाईल कोणाचा आहे, हे सांगता येत नाही असे सूत्रांकडून कळले आहे.

सहकर्मचारीबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली तरुण तेजपाल गेल्या एक महिना जेल मध्ये आहे.
तेजपालविरुद्ध चार्जशीट दाखल केली असून, ४ मार्चला जामीन याचिकेची सुनावणी होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 24, 2014, 12:08


comments powered by Disqus